आंबेत घाटात शिवशाहीचा ब्रेक फेल, सुदैवाने सर्व प्रवाशी बचावले

म्हसळा : निकेश कोकचा 

आंबेत नांदवी घाटामध्ये  दापोली नालासोपारा  बसचा आंबेत बसस्थानकासमोर ब्रेक निकामी झाल्याने प्रसंगावधानाने एसटी चालकाने एसटी वाहन बसस्थानकात आतील बाजूतील रस्त्याच्या कडेला सारून सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आणले आहे ,त्यामुळे सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती सदर बसचे वाहक यांनी सांगितले आहे.
सदर बसमधील वाहन चालक यांच्याकडून अधिक माहीती जाणून घेतली असता,एसटी आगार डेपो यांना  याबाबत या घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची योग्य मदत न मिळाल्याने आम्हाला याठिकाणी ताटकळत राहावं लागल्याने याचा फटका प्रवाशी वर्गाला जास्त प्रमाणात सहन करावा लागला असल्याने काही प्रवाशी या बाबीमुळे अडकून पडले ,आंबेत परिसरात दापोली,मंडणगड आगाराच्या बसेस याआधीही अशा प्रसंगाला सामोरे गेलेले आहेत,याला मुख्य जबाबदार एसटी डेपो अधिकारिच जबाबदार आहेत, एसटी डेपोच्या या भोंगळ कारभारामुळे ऐन पावसाच्या तडाख्यात एसटी बसेसच्या प्रवाशांना अशा पद्धतीने सामोरे जावे लागत असल्याने राज्य परिवर्तन विभागाने अशा भोंगळ कारभार चालत असलेल्या डेपोकडे तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी.आंबेत बसस्थानकातसुद्धा प्रवाशांच्या तसेच एसटी वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच दुरुस्तीअभावी कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने याठिकाणी होत असलेल्या अपघातांना एसटी महामंडळाने योग्य खबरदारी घेऊन गरजे युक्त साधनांचा पुरेपूर साठा त्याठिकाणी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून होताना दिसत आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत