आंबेत घाटात शिवशाही बस घसरली; सर्व प्रवाशी सुरक्षित 

म्हसळा : निकेश कोकचा 

आंबेत नांदवी घाटामध्ये वाहनांची घसरण सुरु असतानाच गुरुवार दि.२० जुलै रोजी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास एक मुंबईकडून दापोलीकडे जाणारी शिवशाही बस घसरण्याची घटना घडली आहे. दैव बलवंत म्हणून सदर अपघातग्रस्त बस ही स्त्याच्या कडेला उभी राहिल्याने सर्व प्रवाश्यांचे जीव थोडक्या साठी वाचले असल्याची माहिती वाहनचालक दाऊद बांगी यांनी दिली.
आंबेत घाटात शिवशाही बस घसरली; सर्व प्रवाशी सुरक्षित
अपघातग्रस्त  शिवशाही बस ही  आंबेत घाटातील धोकादायक असलेल्या वळणावर समोरुण येणाऱ्या अवजड वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे रस्त्यावरून खाली घसरली असल्याचे  वाहन चालक बांगी यांनी सांगितले.या घटनेनंतर पुरार येथील स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर शिवशाही बसची पाहणी करून मदत केली.
आंबेत घाटातील रस्त्याच्या रुंदीकरण अभावी शिवशाही सारखी मोठी बस रस्त्याच्या पृष्ठ भागावर योग्य जागेत फिरत नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा चिखल झालं असल्याने अशी वाहने घसरून अपघातांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे सदर वळणावर आणखी रस्त्याची वाढ करून अशा अपघातांना कुठेतरी नियंत्रन बसेल अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे .
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.