आंबेत-नांदवी घाटामध्ये वळणावर शिवशाही बस घसरली

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा तालुक्यातील आंबेत नांदवी घाटामध्ये शिवशाही बस एका अवजड वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने घसरूण अपघात झाल्याची घटना बुधवार दि. २९ ऑगस्ट रोजी घडली आहे. या अपघातामध्ये बस चालक, वाहक व चौदा प्रवाशी थोडक्यासाठी बचावले आहेत.

दापोली येथून सुटणारी दापोली नालासोपारा शिवशाही एमएच ०९ ईएम ३६५३ या क्रमांकाची बस सकाळी १० : ३० च्या सुमारास आंबेत- नांदवी घाटामधिल आयजी देवी मंदिराच्या पहिल्या अवघड वळणावर आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला. यानंतर बस घसरत रस्ता ओलांडून दरिमध्ये जात असताना बसच्या मागचा चाक खड्यांत अडकल्याने बस समोरील ५० फुट खोल दरित जाण्या पासून थांबली व मोठा अपघात टळला.

बस मध्ये चालक, वाहक यांच्या सहीत १४ प्रवाशी होते. यामध्ये ५ महिलांचा देखील समावेश आहे.आंबेत नांदवी घाटामध्ये शिवशाही बसचा अपघात होऊन २४ तास उलटले असले तरी प्रशासनाने या अपघाताची दखल घेतलेली नाही. यामुळे ही बस अपघाताच्या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी अद्यापही बस उभी असून परिसरातील वाहतुकीसाठी मार्ग बंद आहे. रायगड जिल्हया मध्ये चालकांच्या अनुभवाअभावी शिवशाहीच्या वारंवार होणाऱ्या अपघाताची प्रवाश्यांनी धास्ती घेतली असुन शिवशाही पेक्षा लाल परिबरी असे म्हणण्याची वेळ प्रवाश्यांवर आली आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत