आंबेत मध्ये एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

म्हसळा : निकेश कोकचा 

म्हसळा तालुक्यातील आंबेत हदीत एका अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घरी एकवीस वर्षाच्या तरुणाने भरदिवसा दुपारी १२.३० च्या सुमारास बौधवाडी  हद्दीतील एका चाळीमध्ये  घरी कोणी नसल्याच पाहताच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रकार केल्याच उघड झाल आहे.
सविस्तर वृत्त असे कि, कुमारी राणीत दादा चव्हाण वय वर्ष १७ राहणार आंबेत बौध्वाडी ता.म्हसळा जि.रायगड ही प्रथम वर्ष सायन्स शाखेत शिकत असून ती आपल्या राहत्या घरी एकटीच असल्याच सुरज सूभाष मोरे या २१ वर्षीय तरुणाला समजले. नेहमीप्रमाणे दुध टाकणाऱ्या या तरुणाची साधारण या तरुणीशी फक्त ओळख झाली होती. परंतु  या तरुणाने सदर मुलीला वेगळ्या वळणाने पाहून या दिवशी हे कृत्य करण्याचे ठरवले.  बुधवार दि १३ जुन रोजी दुपारी १२ च्या सुमारास घरी कोणी नसल्याच पाहून रनिता चव्हाण हि मुलगी आपल्या राहत्या घरी जेवण बनवत असताना सुरज या तरुणाने मागून जाऊन पिडीत मुलीला मिठी मारली. आणि तिच्याजवळ अश्लील चाले करण्यास सुरु केले.
त्यानानातर या मुलीने  घरातून  पळ  काढत आरडा ओरड केली.  आजूबाजूला असलेल्या काही मंडळींना जमवल असता आरोपी सुरज मोरे यांच्या वाडीतील काही मंडळींनी या तरुणीच्या घरच्या मंडळींवर  हात उचलल्याचे यावेळी पिडीत तरुणीच्या घरच्यांनी नोंदविलेल्या फिर्यादीवरून समजते. घाबरलेल्या पिढीत तरुणीने आपल्या आई वडिलांसह या प्रकारची घडलेली बाब उघड करण्यासाठी आंबेत पोलीस चेक पोस्ट मध्ये धाव घेतली. त्यानंतर  सदर आरोपीला गोरेगाव पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक ए.जी टोम्पे,उपनिरीक्षक पी.जे.खोत,यांच्या तपासाखाली हा गुन्हा नोंदविण्यात आले..या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतर आरोपी सुरज सुभाष मोरे यावर बालकांचे लैंगिक अपराध संरक्षण कायदा २०१२च्या कलमानुसार ७ व८ पोस्को नियम लावण्यात आलेला आहे.
सध्या रायगड जिल्ह्यात अशा घटनांची मालिका सुरूच असल्याने तरुण मुलींचं जीवन अजूनही धोक्यात असल्याच या विकृत गुन्हेगारीवरून समजते त्यामुळे भरदिवसा घरी घुसून असे नराधम स्त्री जातींवर अत्याचार करीत असतील तर कुठे गेली महाराष्ट्राची संस्कृती आणि कुठे गेली ती माणुसकी सध्या अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले असल्याने अशा मुलींनी घराबाहेर पडायचं कि नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
रायगड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहता त्याच मुख्य कारण इंटरनेटचा गैरवापर व हातातील तरुण पिढीला हे  बिघडवणारे हे स्मार्ट  फोन यामधून नको त्या अश्लील फोटो किवा विडीओपाहून समाजात वस्तीत नको ते कृत्य करण्यास भाग पडत आहेत.याल[ वेळीच आवर घातला गेला नाही कि असे प्रकार सर्रास पणे  आज संपूर्ण देशात पहावयास मिळतील.
आंबेत बौधवाडी हद्दीत असलेल्या चाळीतील घडलेला प्रकार अतिशय लज्जास्पद असल्याने समाजात अशा प्रकारामुळे वाद वाढण्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे अशा प्रकारची बाब हि समाजाला एक प्रकारची काळिमा फासणारी असून त्याचा आंबेत मधील सर्व धर्मीय समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे आगामी काळात असे प्रकार शक्यतो होणार नाहीत याची आंबेत ग्रामवासियांकडून खबरदारी घेण्यात येईल.
राजेंद्र सावंत- आंबेत तंटामुक्त अध्यक्ष
 आरोपी सुरज मोरे
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत