आंबेनळी अपघात : प्रकाश सावंत देसाईं यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी!

दापोली : रायगड माझा वृत्त 

आंबेनळी अपघातील मृतांच्या नातेवाईकांचा अखेर संयम तुटलाय. अपघातात एकमेव बचावले प्रकाश देसाईं यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. जर का ते या अपघातास जबाबदार असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी देखील मागणी केली आहे.

आंबेनळी घाटातील बस अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला असून आज या अपघातातील मृतांचे नातेवाईक हे कोकण कृषी विद्यापीठात घुसले आहेत. या अपघातात एकट्या बचावलेल्या प्रकाश सांवत देसाईला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी यावेळी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. जर यात ते दोषी निघाले तर त्यांना कामावरून बडतर्फ करा असंही मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर प्रकाश सावंत देसाई यांना फाशीची शिक्षा द्या अशा घोषणादेखील नातेवाईकांनी विद्यापीठात दिल्या आहेत.

२८ जुलैच्या सकाळी साडे १० च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३0 जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारकरित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली. मात्र या दुर्घेटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंतावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. 31 जणांपैकी 30 जणांचा जागीच मृत्यू होतो आणि एक इसम कसा वाचू शकतो? असा आरोप करुन कुटुंबियांनी प्रकाश सावंताच्या बचावण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मृतांच्या नातेवाईकांनी नक्की कोणते प्रश्न उपस्थित केलेत 

  • बसमधील ३3 जणांपैकी एकटे प्रकाश सावंत देसाईच कसे काय वाचले?
  • ते नेमके कुठे बसले होते?
  • ते एकटेच कसे काय बसच्या बाहेर फेकले गेले?
  • शेवाळं लागलेल्या कातळावरुन प्रकाश सावंत देसाई कसे काय वर आले?
  • प्रकाश सावंत यांनी पोलिसांसह प्रसार माध्यमांना वेगवेगळी उत्तर का दिली?

असे अनेक प्रश्न मृतांच्या नातेवाईकांनी उपस्थित केले आहे. मृतांच्या नातेवाईकांनी प्रकाश देसाई यांच्या विरोधात केलेल्या तक्रारींवर पोलीस कशाप्रकारे कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत