आंबेनळी घाटात आढळली जळालेली दोन मृतदेह!

महाड : सिद्धांत कारेकर

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात होऊन तीस जण ठार झाल्याच्या घटनेनंतर अकराव्या दिवशी याच आंबेनळी घाटांमध्ये एक महिलेचा तिच्या मुलासह अर्धवट जळालेला मृतदेह  आढळून आल्याने खळबळ उडाली. हे माय-लेक महाड येथून बेपत्ता झाल्याची तक्रार आज मंगळवारीच पोलीस ठाण्यामध्ये नोंदविण्यात आली आहे.

सोमवारी येथील महिला तिच्या मुलाला ऍक्टिवा स्कुटी (क्र. युपी२६ वाय ३०९०)वरून घेऊन गेली असता तेथून ते दोघेही बेपत्ता झाल्याची मिसिंग तक्रार महाड शहर पोलिसांना आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता प्राप्त झाली. यासंदर्भात महाड पोलीस ठाण्याचे आर.पी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस नाईक आर.पी. नागे हे अधिक तपास करीत होते.

स्वदेश फाउंडेशन चे कर्मचारी ललीत गंगवार-पटेल यांनी त्यांची पत्नी शीतल ललीत गंगवार (वय ३४) आणि मुलगा देवांग (वय ३) हे दोघे बेपत्ता असल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले होते.


महाड शहर पोलिस ठाण्यांमध्ये मिसिंग तक्रार दाखल होण्यापूर्वीच पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये पायटा या गावानजीक दरीमध्ये महाड येथून बेपत्ता झालेल्या मायलेकांची प्रेतं अर्धवट जळालेल्या अवस्थेत आज सकाळी आढळून आल्याची माहिती मिळताच पोलादपूर तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली.
मयत महिलेचे नाव शितल ललित गंगवार पटेल (वय ३४ वर्षे) तर तिच्या मुलाचे नाव देवांग ललित गंगवार पटेल(वय ३ वर्षे) असे आहे.

घटनेचे वृत्त समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार आणि सहकारीएएस आय जंगम, महिला पोलीस सुवर्णा खाडे, पोलीस नाईक वार्डे तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पायटा गावामध्ये रस्त्यापासून काही अंतरावर कुठे आढळून आली त्यापुढे काही पावलांवर झुडपांमध्ये मायलेकांची प्रेतं अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये दिसून आली.

पोलादपूर पोलिसांनी या घटनेची खबर मयत महिलेचा ललित तेजबहादुर गंगवार (रा. सुंदरवाडी,ता. महाड, मूळ रा. मलकापूर, जि. पीलभीत, उत्तर प्रदेश) याला कळवून पोलादपूर येथे आणखी ओळख पटवण्यासाठी बोलाविले. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले .

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत