महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात बस कोसळली; ३२जणांचा मृत्यू

पोलादपूर : सिद्धांत कारेकर

कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळ आंबेनळी घाटात एक खासगी बस 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. 

दापोलीहून महाबळेश्वरकरता निघताना घेतलेला फोटो

सुदैवाने बसमधील एक प्रवासी बचावला आहे. प्रकाश ठाकूर-देसाई असे बचावलेल्या प्रवाशाचे नाव आहे.  त्याने खोल दरीतून वर येत, मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला फोन करुन झालेल्या अपघाताची माहिती दिली.

 सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील पोलिस अन् ट्रॅकर्सचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते. महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली. खोल दरीत बस कोसळल्याने बसचा चेंदामेंदा झाला आहे. इतकंच नाही तर मृतदेहांची अवस्था छिन्नविछिन्न झाली आहे.

 

दरम्यान, अपघातातून बचावले प्रकाश ठाकूर-देसाई घाटातून वर येऊन त्यांनी या अपघाताची माहिती कोकण कृषी विद्यापीठाला कळवली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी महाबळेश्वर येथील ट्रेकर्सही बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. मुसळधार पाऊस पडत असतानाही बघ्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी कूमक कमी असल्याने गर्दीला आवर घालणे कठीण होऊन बसले होते.

 

दापोलीहून कृषी विद्यापीठाची बस घेऊन हे प्रवासी पर्यटनाला गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. घाटातून जात असताना त्यांच्या बसला अपघात झाला आणि बस 200 फूट दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळतास पोलीस आणि रुग्णावाहीका त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या गाड्याही घटवनास्थळी दाखल झाल्या आहे.

आंबेनळी घाटात पर्यटकांनी भरलेली खासगी बस 200 फूट दरीत कोसळली

या घाटात मोबाईलला नेटवर्क नसल्याने बसमध्ये असलेल्या कोणाशीही संपर्क होऊ शकत नाही आहे. त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला याबद्द्ल अद्याप कोणतीही माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान, पोलीसांची मोठी टीम हे सर्च ऑपरेशन करत आहे. त्यामुळे यात नेमके किती जण होते याबद्दलही काहीच माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. कोणाशीही संपर्क होत नसल्यामुळे या बसमध्ये नेमके कुठले पर्यटक होते याबद्दलही अद्याप कळू शकलेलं नाही.

अपघातातील मृतांची नावे

राजेंद्र बंडबे, हेमंत सुर्वे, सुनील कदम, रोषन तबीब, संदीप सुवरे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, गोरक्षनाथ तोंडे, दत्ताराम धायगुडे, रत्नाकर पागडे, प्रमोद शिगवण, संतोष जालगावकर, शिवदास आगरे, सचिन गिम्हवणेकर, संजय सावंत, राजेंद्र रिसबुड, सुनिल साटले, रितेश जाधव, पंकज कदम, निलेश तांबे, संतोष झगडे, अनिल सावके, संदीप भोसले, विक्रांत शिंदे, सचिन गुजर, राजाराम गावडे, राजेश सावंत, सचिन झगडे, रवीकिरण साळवी, संजीव झगडे, सुशय बाळ

एकमेव बचावले – प्रकाश सावंत देसाई

शेयर करा

One thought on “महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात बस कोसळली; ३२जणांचा मृत्यू

  1. Tyanna vachva amcha prakariya naka vicharu. Thodi akkal Asel tar Ashe prashna naka vicharat jau. Shen khayche tar tumhi Loka band karat Nahi. Nidaan tya gadi madhe fasnarya lokansathi Kahi tari Kara. TRAP Sathi udya tumhi svatahala pan vikayla Kami karnar nahi. Vika shevti toh tumcha prashna ahe parantu ek lakshat theva tumchi Kahi layki Nahi ahe. Jevha baghava tevha pratikriya dya. Kaama Kara ani mag vichara.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत