आंबेनळी बचावकार्यात सहकार्य केल्याबद्दल महेश सानप यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार!

कोलाड : कल्पेश पवार 

रोहे तालुक्यातील कोलाड संभे हद्दीत असणाऱ्या महेश सानप यांच्या वाईल्डर वेस्ट अँडव्हेंचर या टीमने आंबेनळी पोलादपुर घाटात झालेल्या दुर्दैवी अपघातात बचावकार्याची धुरा यशस्वी संभाळल्याबद्दल मा .मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रशस्तीपत्र देहून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

जग प्रसिद्ध असणारी महेश सानप यांची कोलाड येथील वाईल्डरवेस्ट अँडव्हेंचर ही संस्था,जीवाची पर्वा न बाळगता नेहमी मदतकार्यात सहभागी होत असते ,असाच एक दुर्देवी अपघात 28 जुलै 2018 रोजी आंबेनळी पोलादपुर घाटात झाला. या अपघातात बस दरीत कोसळून 30 जण मुत्यु मुखी पडले,त्यामुळे येथे खोल दरीत बचाव कार्य करणे खूप अवघड होते.

परंतु अशा परिस्तिथीत सुध्दा जीवाची पर्वा न बाळगता ईतर संस्था बरोबरच कोलाड येथील वाईल्डरवेस्ट अँडव्हेंचर चे मालक श्री महेश सानप व टीम ,वीरेंद्र सावंत,नितीन लहाने,पपु पवार,शैलेश महाबले,राहुल पाटणूसकर,गीतांजली बोर्डोली,हरेश सानप,रोशन सानप, सुनिल सानप यांनी दुर्दैवी अपघातात बचावकार्याची धुरा यशस्वी संभाळल्याबद्दल व प्रतिकुल परीस्थीतीत असामान्य कार्य केल्याबद्दल
स्वातंत्र दीनाच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणविस राज्यमंत्री तसेच पालकमंत्री रायगड मा.रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्ते व कलेक्टर डॉ.विजयी सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत महेश सानप यांना प्रशस्तीपत्र देहून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत