आंबेनळी बस अपघात; मृत बस चालकाविरोधात गुन्हा

पोलादपूर : रायगड माझा वृत्त

राज्याला हादरून टाकणाऱ्या व कोकण परिसरात शोककळा पसलेल्या २८ जुलै २०१८ मध्ये पोलादपूर-वाई सुरूर राज्य मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला होता. या अपघातात ३० कर्मचारी जागीच ठार झाले होते. याप्रकरणी पाच महिन्यानंतर मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बस चालक प्रशांत भांबेड याने २८ जुलै २०१८ रोजी त्याच्या ताब्यातील बस (क्र. एम एच ०८ ई ९०८७) ही दापोली ते महाबळेश्वर दरम्यान घेऊन जात होते. मौजे दाभोळ गावाच्या हद्दीत रस्ता सरळ व कमी चढणीचा असतानादेखील निष्काळजीपणाने व रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून अपघात केला. या अपघातात बस आठशे ते नऊशे फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये ३० प्रवासी ठार झाले. या अपघाताला चालक भांबेड हा कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलादपूर पोलिसात गुन्‍हा दाखल करण्यात आला.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत