मुंबई :रायगड माझा
मोदी सरकारने ४ वर्षांत जनतेचा कसा विश्वासघात केला आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही विविध शासकीय संस्थांची आकडेवारी आहोत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आमचे म्हणणे खोडून काढण्यासाठी हिंमत असेल तर आकडेवारीला आकडेवारीनेच उत्तर द्यावे. लोक काही घास खात नाहीत हे लक्षात ठेवावे, अशा कठोर शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
देशातले कोणतेही क्षेत्र आज सुरक्षित राहिलेले नाही. धमक्या, पैशांचे आमिष नाहीतर कायद्याच्या कचाट्यात अडकवणे, असे सुडाचे राजकारण भाजपाने सुरू केले आहे. काँग्रेसमुक्त भारत घोषणा करताना मात्र त्यांना निवडून येण्यासाठी आमच्या सारख्या पक्षातलेच लोक लागत आहेत, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
कल्पनेच्या पलिकडे भाजपाने जनतेचा विश्वासघात केला आहे. आम्ही सरकारच्या कामाचे मूल्यमापन त्यांनी दिलेल्या आकडेवारीच्याच आधारे केले आहे, असे सांगत सिंघवी यांनी ‘विश्वासघाताची ४ वर्षे’ ही पुस्तिकाच सादर केली. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, मुख्य प्रवक्ते सचिन सावंत आदींची उपस्थिती होती.