आगरी समाजाचा गुणगौरव सोहळा संपन्न

नेरळ: रायगड माझा वृत्त

कर्जत तालुक्यातील आगरी समाज संघटनेच्या वतीने आगरी समाजासह इतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नेरळ येथील आगरी समाजाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.

कर्जत तालुक्यात मोठ्या संख्येने असलेल्या आगरी समाजाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात. याच उपक्रमाचा भाग म्हणून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नेरळ येथील आगरी समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. आगरी समाजाचे अध्यक्ष सावळाराम जाधव , उपाध्यक्ष प्रवीण पाटील . रायगड जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे , माथेरानच्या माजी नगराध्यक्षा बबिता शेळके यांच्यासह विविध क्षेत्रात नाव लौकिक मिळविलेले आगरी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी कळंब जिल्हा परिषद वॉर्डातून बिन विरोध निवड झालेले माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाची सुरवात करण्यात आली . आगरी समजणे काळाबरोबर जरूर बदलले पाहिजे मात्र आपली भाषा संस्कृती हे आपले वैभव असून ते जपण्याचे आवाहन उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. समजणारे दिलेली कौतुकाची थाप निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास आगरी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत