आगरी समाजाने गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना दत्तक घ्यावे – जगन्नाथ पाटील

कर्जत : अजय गायकवाड

समाजातील मान्यवरांनी काही आर्थिक रक्कम गोळा करून समाजातील गरीब परंतु हुशार विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण घेतले पाहिजे यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी केले.कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलत होते.

आगरी समाज संघटनेचा गुणगौरव सोहळा  कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या मार्केवाडी येथील श्री मयुरेश मंगल कार्यालय  येथे झालेल्या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष एकनाथ धुळे, इतिहास संशोधक वसंत कोळंबे, जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती उत्तम कोळंबे, संघटनेचे माजी अध्यक्ष बबन धुळे, तसेच हरिचन्द्र टोकरे, कर्जत तालुका खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष शंकर भुसारी,कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गजानन पेमारे,संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप माळी,प्रवीण पाटील,कर्जत पंचायत समितीचे सदस्या कविता ऐनकर यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले.आगरी समाजाच्या वतीने तालुक्यातील दहावी आणि बारावी मधील तसेच 80 टक्के हुन अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र,स्कुल बॅग देऊबी सन्मानित करण्यात आले.त्यात दहावी मध्ये अनघा हरिभाऊ माळी-95.60,तर बीएस्सी मध्ये  सुप्रिया रामदास भगत-96% यांच्यासह 120 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी बोलतानाइतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना 95 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी यांचे यश हे अद्भुत आहे.त्यांनी देशाचे भविष्य घडविणारे,प्रशासन चालविणारे अधिकारी होण्याचे ध्येय समोर ठेवण्याचे आवाहन कोळंबे यांनी केले.समाजातील कार्यकर्ते वर्गणी काढून तुमचा सत्कार करतात ही बाब आपण सर्व विद्यार्थ्यांनी देश चालविणारे अधिकारी व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.आगरी समाजाचा 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आणि हुतात्मा हिराजी पाटील यांचा जन्म तारखेबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे नियोजन आगरी समाज संघटनेचे कार्यकारिणी सदस्य शिवराममहाराज तुपे,नारायण धुळे,सुरेश गोमारे,श्रीराम राणे,रामचंद्र भवारे,मनीषा दळवी,अरुण कराळे,आदीच्या मार्गदर्शनाखाली तरुण कार्यकर्त्यांनी केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत