आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणूनच प्लास्टिकबंदीचा निर्णय!

मुंबई :रायगड माझा 

आगामी निवडणुकांमध्ये प्लास्टिक कंपन्यांकडून फंड मिळावा म्हणूनच सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला तर नाही ना? अशी शंका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

जोपर्यंत महापालिका आणि राज्य सरकार स्वतःची कामं नीट करत नाहीत, तोपर्यंत कुणीही दंड देऊ नये, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं आहे.

प्लास्टिकबंदीचा निर्णय सरकारने घेतला आहे, मग आमच्या प्रश्नांना सरकारने उत्तर द्यावं, रामदास कदम यांनी नात्यांवर भाष्य करु नये, अशा शब्दात राज ठाकरे कदमानंही सुनावलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत