आघाडीचं सरकार चालवताना मी विष पचवतोय; मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर

बंगळुरु : रायगड माझा 

आघाडीचं सरकार चालवताना मला माझं दुःख लपवावं लागतंय. जे विष पचवण्यापेक्षा कमी नाहीये, अशा शब्दात कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शेतकरी कर्जमाफीमुळे जनता दल सेक्युलरने कुमारस्वामींच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना कुमारस्वामींना अश्रू अनावर झाले.

माझ्या सरकारला स्पष्ट जनादेश नाही, असं सरकार चालवण्यात मला आनंद नाही. निवडणुकीवेळी मतदान करताना लोक मला आणि माझ्या पक्षाला विसरले होते, असंही ते यावेळी म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत