आजी-आजोबा घरातूनच चालवायचे सेक्स रॅकेट

मुंबई : रायगड माझा

झटपट पैसा कमविण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मुलुंडमधील एका वयोवृद्ध दाम्पत्याने पैशांसाठी आपल्या घरातच वेश्याव्यवसाय थाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलुंडच्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये गेल्या २ वर्षांपासून हा वेश्याव्यवसाय सुरू होता. मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी हरिश करमसी सोता (७२) आणि देवीबेन सोता (६५) या वयोवद्ध दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहेत, दोघेही पोलीस कोठडीत आहेत.


मुलुंड पश्चिमेकडील अजंता इमारतीतील फ्लट क्रमांक १६ मध्ये हे दाम्पत्य राहते. हरिश हे एका बड्या कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत, तर त्यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांना दोन मुली आहेत. दोघींचीही लग्ने झाले असून, यातील एक विदेशात तर दुसरी मुंबईत राहते. कायम ऐशआरामात राहिलेल्या सोता यांना वृद्धापकाळात घरखर्च भागविणे कठीण झाले होते. यातूनच झटपट पैसा कमाविण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली.
वृद्धापकाळात हातापायात ताकद नसल्याने कोणते काम करणेही कठीण. अशा विवंचनेत असताना सोता यांची पत्नी वेश्याव्यवसाय करणाऱ्या काही मुलींच्या संपर्कात आली. घरात वेश्याव्यवसाय करण्यासाठी जागा दिल्यास, त्या बदल्यात जास्तीचे पैसे मिळतील, म्हणून तिने याबाबत पतीला सांगितले. नातेवाईक, तसेच शेजाºयांचेही घरी ये-जा नसते. त्यामुळे घरात हा धंदा सुरू केला, तरी कुणाला संशय येणार नाही, असे तिने पतीला पटवून सांगितल्यामुळे त्यानेही होकार दिला. दोघांनी घरातच वेश्याव्यवसाय सुरू केला.
ग्राहकांना ते नातेवाईक असल्याचे भासवत होते. त्यामुळे त्यांच्यावर संशय येत नसे. मात्र, गेल्या काही दिवसांत ग्राहकांच्या रांगा लागल्याने याची माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली. मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने त्यांच्या घरी छापा टाकला. तेव्हा तेथून एका २२ वर्षांच्या मुलीला त्यांनी ताब्यात घेतले. चौकशीत हे दाम्पत्य घरातच सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती उघड झाली.
गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. अधिक चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का? या दिशेने ते अधिक तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत