आज रात्रीपासून विशेष ब्लॉक ; विद्याविहारच्या पुलासाठी मेगाब्लॉक

मुंबई : रायगड माझा वृत्त

मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर रविवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४.१५पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवर आज, शनिवारी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. विद्याविहार येथे पादचारी पुलासाठी गर्डर उभारण्यासाठी शनिवारी रा. ११.४० ते रविवारी पहाटे ४.५०पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे.

mega blocks for the bridge of vidyavihar

 

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर स. ११.१५ ते दु. ४.१५पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत कल्याणहून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल स. १०.३७ ते दु. ३.५६ वेळेत दिवा आणि परळ स्थानकापर्यंत धीम्या मार्गावर धावतील. परळनंतर पुन्हा जलद मार्गावर चालतील. सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद, अर्धजलद लोकल स. १०.०५ ते दु. ३.२२पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकातही थांबतील. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर गाडी दिवा येथेच थांबवण्यात येईल. ही गाडी दादरऐवजी दिवा स्थानकाहून रवाना होईल. या गाडीच्या प्रवाशांसाठी दादर ते दिवासाठी दु. ३.४० वाजता विशेष लोकल सोडण्यात येईल.
मध्य रेल्वेवर कुर्ला ते विद्याविहार स्थानकात पादचारी पुलावर गर्डर उभारण्यासाठी शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक रा. ११.४० ते पहाटे ४.५०पर्यंत चालणार आहे. त्यात अप धीम्या मार्गावर रात्री ११.४० ते पहाटे ४.५०, डाऊन जलद मार्गावर रा. ११.४० ते पहाटे ४.५०, अप जलद मार्गावर मध्यरात्री १२.३० ते पहाटे ३.३०पर्यंत ब्लॉक चालेल. घाटकोपरहून सुटणाऱ्या सर्व धीम्या लोकल रा. ११.२८ ते मध्यरात्री १२.१०पर्यंत आणि रविवारी पहाटे ४.२० ते ४.२४पर्यंत विद्याविहार ते माटुंगापर्यंत धावतील. या लोकल विद्याविहार येथे थांबणार नाहीत. खोपोली ते सीएसएमटी लोकल कल्याणहून रा. ११.३४ वा. आणि बदलापूर ते सीएसएमटी ही लोकल कल्याणहून रा. ११.५२ वाजता सुटून ठाण्यापर्यंतच धावतील.

पनवेल, वाशीसाठीची सेवा खंडित 

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर स. ११.३० ते दु. ४.३०पर्यंत ब्लॉक चालणार आहे. सीएसएमटीहून पनवेल, बेलापूर, वाशीला जाणाऱ्या लोकल स. ११.०६ ते दु. ४.३४पर्यंत आणि पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसएमटीपर्यंत स. १०.०३ ते दु. ३.३९ पर्यंत सेवा खंडित करण्यात आली आहे. ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल ते ठाण्यापर्यंत स. १०.१२ ते दु. ४.२६ आणि पनवेल ते ठाण्यापर्यंत स. ११.१४ ते दु. ४पर्यंत सेवा खंडित राहतील. ट्रान्सहार्बर सेवा ठाणे ते वाशी-नेरुळ स्थानकापर्यंत सुरू राहतील.

पश्चिम रेल्वेवर काही लोकल रद्द

पश्चिम रेल्वेवर रविवारी सांताक्रूझ ते माहीम स्थानकामध्ये स. १०.३५ ते दु. ३.३५पर्यंत दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत