आठवले दक्षिण मध्य मुंबईतून लढणार

मुंबई : रायगड माझा वृत्त

आंबेडकरी जनता माझ्यासोबतच आहे असा दावा करून, आगामी निवडणूक दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपण लढणार आहोत असे रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे जाहीर केले. आपण आणि आपला रिपब्लिकन पक्ष हा भाजप शिवसेनेसोबत गेल्यामुळे माझ्यासोबत किती लोक आहेत हे कामगार स्टेडिअमच्या आजच्या मेळाव्याने दाखवून दिले असेही आठवले यांनी सांगितले.

देशाचे संविधान आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. ‘कोणी कितीही दावा केला तर आगामी लोकसभा निवडणुकीनंतर माझ्या विरोधकांच्या डोक्यातील हवा उतरून जाईल. कारण मी हवेत काम करणारा कार्यकर्ता नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपाइं साकार करण्यासाठी लोकांसोबत काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे देशभरातील आंबेडकरी बहुजन जनता माझ्यासोबत खंबीरपणे आहे. त्यामुळेच आज मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यास आंबेडकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आगामी लोकसभा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातूनच लढण्याचा निर्धार आठवले यांनी यावेळी जाहीर केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत