आडोशी रस्त्याची चाळण; पाण्यानी भरलेल्या खड्ड्यातून काढव लागतोय मार्ग

खोपोली: समाधान दिसले  

सतत पडणाऱ्या पावसाने खालापूर तालुक्यातील रस्ते जलमय झाले आहे. रस्त्यांवर पाणी आल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांतून आपला मार्गक्रमण करावा लागत आहे. याची प्रवासी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे.

खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्ड्यात अशी अवस्था आत्करगाव आडोशी मार्गाची बनली आहे. या मार्गावरून प्रवास करणे वाहन चालकांना अवघड बनले आहे. रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांबाबत प्रशासनाविरोधात संतापाची लाट उमटत आहे. या मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकेदायक झाला आहे, तरी या रस्त्याचे काम त्वरित करीत मार्ग खड्डे मुक्त करा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बाईट : नितेश पाटील – प्रवासी गेल्यावर्षीच हा मार्ग कॉंक्रीटचा करण्यासाठी काम सुरु झाले होते. पहिल्या टप्प्यातील काम सुरु झाल्यानंतर निकृष्ठ झालेल्या कामाबद्दल नागरिकांनी आवाज उठविला होता. मात्र नागरिकांच्या तक्रारीनंतर देखील काम पूर्ण न केल्याने आता पावसाळा सुरु झाल्यानंतर हा रस्ता पुन्हा खड्ड्यांचा बनला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामाकडे अधिकारी लक्ष देणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत