आढळराव पाटलांचा अजित पवारांवर एकेरी शब्दात हल्ला, राजकारण तापणार

शिरूर : रायगड माझा वृत्त 

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘ज्याला आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, त्याने माझ्यावर टीका करणं बरोबर नाही’,असा हल्लाबोल शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.

     

‘अजित पवारांना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही. तेव्हा चेहरा कुणाचा काळवंडलाय हे अख्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मी राजकारणात स्वतःच्या हिंमतीवर आलोय, माझे चुलते मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री नव्हते. बांदल, मोहिते हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. मारामाऱ्या, दंगली तुम्ही घडवायच्या, जमीन व्यवहारातून लोकांची फसवणूक तुम्ही करायची, खंडणी तुम्ही गोळा करायची आणि पोलिसांनी कारवाई केल्यावर नाव आढळराव पाटलांचं घ्यायचं, हे कुठलं राजकारण?’ असा सवाल करत आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतलं. अजित पवार यांनी लोकसभेतील पराभवावरून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये टीका केली होती. त्यावरून आता आढळराव पाटलांनी पलटवार केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि राष्ट्रवादीतील ही जुगलबंदी चांगलीच रंगणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत