आणखी एका भाजप नेत्यावर बलात्काराचा आरोप

लखनौ : रायगड माझा

उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांचं प्रकरण निवळत नाही तोच लखनौमध्ये भाजप नेत्यासंदर्भातलं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. लखनौमध्ये एका महिलेने पत्रकार परिषद घेत भाजपाचा नेता आणि उच्च न्यायालयाचे अधिवक्ते सतिश शर्मा यांच्यावर तीन वर्षांपासून बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने याप्रकरणी गाजीपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपीला अटक न केल्यास आत्महत्येचा इशाराही पीडितेने दिला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयात ती सतीश शर्मा यांची ज्युनिअर होती. सतीश शर्माने पीडितेचा अश्लील व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ब्लॅकमेल करत सतीशने वारंवार पीडित महिलेचं शारीरिक शोषण केलं. सतीशने पीडित महिलेला धमकीही दिली होती की, ‘माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार केल्यास तुझ्या संपूर्ण कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवेन.’

न्याय मिळावा यासाठी पोलिसांकडे अनेकदा धाव घेतली, मात्र कोणीही मदत केली नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला.

सतीश शर्मा स्वत:ला भाजपचा मोठा नेता म्हणवतो, त्यामुळे त्यांच्या दबावामुळे प्रशासनही गप्प आहे. आता सतीश शर्मा आपल्यावर केस मागे घेण्यासाठीही दबाव टाकत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. सतीश शर्माला पोलिसांनी लवकरत लवकर अटक न केल्यास न्यायालयातच आत्महत्या करण्याच इशारा पीडितेने दिला असून जीवाला धोका असल्याने सुरक्षेची मागणीही तिने केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत