आता आम्ही चौकीदारी करू : शिवराज सिंह

मध्य प्रदेश : रायगड माझा वृत्त
मध्य प्रदेशात भाजपला सत्ता गमावावी लागल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वतः स्वीकारली आहे. आमच्याकडे १०९ आमदार असून आता विरोधकही मजबूत आहे. आमचे रचनात्मक कार्य राहील. आता आमची चौकीदारी करण्याची जबाबदारी आहे, असे शिवराज सिंह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

आता आम्ही २०१९ च्या तयारीला लागणार आहोत. मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात पुन्हा सरकार बनेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

तब्बल १५ वर्षानंतर मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आली आहे. काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. याच दरम्यान शिवराज सिंह यांनी म्हटले आहे की, आम्हाला अपेक्षित यश मिळालेले नाही. ७.५ कोटी मध्य प्रदेशवासी माझ्या परिवाराचे सदस्य आहेत. त्यांचे सुख हे माझे सुख आणि त्यांचे दु:ख हे माझे दु:ख आहे. जनतेच्या विकासाच्या योजना काँग्रेस सुरू ठेवेल. आम्ही मजबूत विरोधक म्हणून भूमिका बजाविणार आहोत. आजपासून माझी चौकीदारी सुरू झाली आहे. तसेच काँग्रसने १० दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. ते त्यांनी पूर्ण करावे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत