आता ओला किंवा उबेरचालकाने भाडे नाकारले तर होणार २५ हजारांचा दंड

रायगड माझा ऑनलाईन । नवी दिल्ली

मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून बुक केल्या जाणाऱ्या ओला, उबेरसारख्या कॅबसेवांना भाडं नाकारणे आता महागात पडू शकतं. कारण, यापुढे भाडं नाकारणे किंवा महिला प्रवाशासोबत गैरवर्तन यासाठी २५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचा दंड कंपनीला भरावा लागू शकतो.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, केजरीवाल सरकार असा नियम आणण्याच्या तयारीत आहे. लायसेन्सिंग अँड रेग्युलेशन अॅप बेस्ड एग्रिगेटर रुल्स २०१७ आणि सिटी टॅक्सी स्कीम २०१७ अशी या दोन्ही नियमावलींची नावं असणार आहेत. कॅब अॅप्लिकेशन ज्या कंपनीचं असेल त्या कंपनीवर काही कठोर नियम लादले जाणार आहेत. जर प्रवाशाने छेडछाड किंवा गैरवर्तनाची तक्रार केली. तर कंपनीने ती तक्रार पोलिसांकडे नोंदवणं अनिवार्य असणार आहे. तसंच धर्म, जात इत्यादी कारणांमुळे भाडे नाकारणाऱ्या ड्रायव्हरवर या नियमांमुळे कडक कारवाई होऊ शकते.

याखेरीज, कॅब कंपन्यांना २४ तास आणि सातही दिवस एक कॉलसेंटर चालवावं लागणार आहे. या कॉलसेंटरमध्ये सगळ्या कॅबचा लाईव्ह डेटा जमा असेल आणि तो डेटा राज्याच्या परिवहन विभागाशी त्यांना शेअर करावा लागेल. गाडीत एक पॅनिक बटन उपलब्ध करून द्यावं लागेल. तसंच अॅप्लिकेशनमध्ये आपली राईड शेअर करण्याचं वेगळं फीचर देणंही अनिवार्य असणार आहे. अॅप्लिकेशनमधील ड्रायव्हरचा फोटो अधिक स्पष्ट आणि गाडीची व्यवस्थित माहिती देणंही गरजेचं आहे. कॅबमध्ये कमीत कमी सहा इंचाचा एक डिस्प्ले बसवावा लागेल, ज्यावर प्रवाशाला रस्ता आणि त्या गाडीचं लोकेशन व्यवस्थित दिसू शकेल. या नियमांखेरीज अॅप्लिकेशनमध्ये फायरवॉलची सुविधाही देण्याचा प्रस्ताव आहे, जेणेकरून प्रवाशाने अॅप्लिकेशनला दिलेली माहिती सुरक्षित राहिल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत