आता कोणत्याही दारूच्या दुकानाला देता येणार नाही महापुरुषांचे नाव, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

 

( रायगड माझा ऑनलाईन टिम )

मुंबई – महापुरुष, देवी-देवता तसेच गडकिल्ल्यांचे नाव राज्यातील कोणत्याही दारुच्या दुकानाला देता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लवकरच याबाबतची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
मार्चमध्ये विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे कोणत्याही दारूच्या दुकानाला महापुरुषांचे नाव न देण्याची मागणी केली होती. राज्यातील बिअर बार, दारुचे दुकाने आणि परमिट रुमला महापुरुषांची तसेच गडकिल्यांची नावे दिल्याचे दिसते, हा महापुरुषांचा अवमान असून राज्याच्या संस्कृतीला शोभणारे हे चित्र नाही असे त्यांनी म्हटले होते.
उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरसिंह पंडित यांच्या सूचनेनंतर कामगार विभाग आणि उत्पादन शुल्क खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर एक समिती कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात या समितीची बैठक पार पडली. देशी दारुची दुकाने, बिअर बार आणि परमिट रुमला महापुरुषांची तसेच देवी- देवता आणि गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याबाबत कामगार विभाग कायद्यात सुधारणा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत