आता नो बॉलवरून नो टेन्शन; नवं तंत्रज्ञान येणार

रायगड माझा वृत्त 

पंचांची एक चूक क्रिकेट सामन्याचं चित्र पालटू शकतं. अनेकदा गोलंदाजानं टाकलेला नो बॉल पंचांच्या नजरेतून सुटतो आणि फलंदाजाला बाद दिलं जातं. रिप्लेमध्ये नो बॉल असल्याचं लक्षात येतं आणि मग खेळाडू पंचांशी हुज्जत घालतात. पण आयसीसीनं आता नो बॉलचं टेन्शन दूर करण्याचं ठरवलं आहे.

नो बॉल तंत्रज्ञानाला आयसीसीनं मंजुरी दिली आहे. भारतातील क्रिकेट सामन्यांत या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर करण्यात येणार आहे. नो बॉल तंत्रज्ञानाद्वारे गोलंदाजाच्या पायावर नजर ठेवली जाणार आहे. गोलंदाज क्रिजवर पाय ठेवतो त्यावेळी तिसरा पंच त्यावर कॅमेऱ्याच्या मदतीनं नजर ठेवणार आहे. गोलंदाजाचा पाय क्रिजच्या पुढे असेल तर तिसरा पंच लगेच मैदानावरील पंचाना माहिती देईल. आतापर्यंत तिसरा पंच डीआरएसची मागणी झाल्यानंतर गोलंदाजाच्या पायावर लक्ष ठेवत होता. मात्र, या तंत्रज्ञानामुळं तिसरा पंच थेट मैदानावरील पंचांनाच नो बॉलसंदर्भात माहिती देणार आहे. हे नो बॉल तंत्रज्ञान खर्चिक असले तरी बीसीसीआयनं केलेल्या मागणीमुळं आयसीसीनं प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी दर्शवली आहे. लवकरच भारतात होणाऱ्या सामन्यांमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत