आता व्हॉट्सऍप वरूनही पाठवता येणार पैसे!

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

 

व्हॉट्सऍप मध्ये आता एक नवं फीचर येणार आहे. व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता व्हॉट्सऍपवरून पैसे सुध्दा पाठवता येणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) व्हॉट्सऍपला यासाठीची परवानगी दिली आहे.

तसेच व्हॉट्सऍप वर आणखी एक नवं फिचर आलं आहे. यामुळे आलेले मेसेज हे सात दिवसांनंतर व्हॉट्सऍपवरून हटणार आहेत. मात्र यासाठी व्हॉट्सऍपवर नव्याने समावेश होणारे डिसअपिअरिंग मेसेजेस हा ऑप्शन मोबाईलधारकाला ऑन ठेवावा लागणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत