आत्महत्या समजून केले मुलाचे अंत्यसंस्कार; 15 सेकंदांच्या मोबाईल व्हिडिओने उलगडले रहस्य

रायगड माझा वृत्त 

भोपाळ – मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात एका कुटुंबियांना त्यांचा मुलगा राहुल 16 जुलै रोजी बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्यांनी वेळीच राहुलला इंदूरच्या रुग्णालयाच्या दिशेने नेले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. डिप्रेशनमुळे त्याने आत्महत्या केल्याचे समजून कुटुंबियांनी त्याच संध्याकाळी राहुलवर अंत्यसंस्कार केले. परंतु, कुटुंबियांनी घरी येऊन जेव्हा राहुलचा मोबाईल तपासला तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्या मोबाईलमध्ये 15 सेकंदांचा एक व्हिडिओ होता. व्हिडिओ पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीन घसरली. राहुलने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या करण्यात आली असा खुलासा त्या व्हिडिओतून झाला.

व्हिडिओमध्ये काय?
मरण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी राहुलने आपल्या मोबाईलमध्ये स्वतःचा एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये राहुलने म्हटले होते, की ‘मी राहुल दाबी आहे. हे माझे नाव आहे. मला जितेंद्र निनामा आणि त्याच्या एका मित्राने बळाचा वापर करून विष पाजले. ते आताच मला फेकून निघून गेले. सद्यस्थितीला मी सुस्थितीत आहे. परंतु, लवकरात लवकर माझा हा संदेश सर्वांना पोहोचवा. अतिशय घाबरलेला राहुल बोलताना सुद्धा अडकत होता.

एका तरुणीने फोनवर सांगितले कुठे आहे राहुल…
– सर्वप्रथम राहुलच्या एका मैत्रिणीने राहुलच्या मित्रांना फोन लावले. तिनेच सर्वांना सांगितले की राहुलने विष पिले आहे. तो सध्या देवरूंडी (झाबुआ) च्या जवळपास आहे.
– ती पुढे म्हणाली, हे त्याच्या वडिलांना सुद्धा सांगा. यानंतर राहुलचे वडील आणि मित्रमंडळी घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी राहुल बेशुद्ध पडलेला होता. अवस्था खूप विकट असल्याने त्याला इंदूरला नेले जात होते. परंतु, रुग्णालय गाठण्यापूर्वीच राहुलचा मृत्यू झाला.
– त्याच्या कुटुंबीय अंत्यसंस्कार पार पाडले आणि घरी परतले. मात्र, रात्री जेव्हा राहुलचा मोबाईल पाहिला, तेव्हा त्यामध्ये त्यांना 15 सेकंदांचा व्हिडिओ सापडला. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला असून याबाबत सविस्तर तपास सुरू आहेत.

तरुणीसह कुटुंबियावरही संशय
ज्या तरुणीने सर्वप्रथम कुटुंबियांना राहुलची माहिती दिली ती कोण आहे याचा तपास पोलिस करत आहेत. सोबतच, राहुलने काय पिले आणि कुठे पडला हे तिला कसे माहिती होते याचा सुद्धा शोध घेतला जात आहे. राहुलने आपल्या मारेकऱ्याचा नाव घेतला त्याचा देखील शोध सुरू आहे. सोबतच राहुलचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला. परंतु, त्या मोबाईलमध्ये सिम कार्ड नाही. सोबतच, विष प्रयोगातून मृत्यू झाल्यानंतरही कुटुंबियांनी त्याचे पोस्टमॉर्टम का केले नाही याचा तपास सुद्धा पोलिस करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत