आत्यासोबत नदीवर गेलेल्या सात वर्षीय साहिलचा बुडून मृत्यू!

नेरळ : अजय गायकवाड
कपडे धुण्यासाठी नदीवर आपल्या आत्या आणि काकांसोबत गेलेल्या पाच मुलांपैकी एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज नेरळ मध्ये घडली आहे. 
नेरळ मोहाचीवाडी येथे राहणारे रेश्मा मोहम्मद जामखंडे आणि तिचे पती हे दोघे नेरळ येथील दामत गावाजवळील नदीवर आपल्या तीन मुलांसह आपल्या भावाच्या अन्य दोन मुलांना कपडे धुण्यासाठी गेले होते. आत्या रेश्मा ह्या कपडे धूत होत्या तर मोहम्मद हे आपली रिक्षा नदीच्या कडेला धुवत होते. त्यावेळी ही पाच मुले नदीत पोहत होते. पोहत असताना सात वर्षाचा साहिल आणि दहा वर्षाचा याकुब हे दोघे पाण्यात बुडत असल्याचे रेश्माला दिसले. तिने मुलांना वाचवण्यासाठी  आरडाओरड करायला सुरुवात केले. तेव्हड्यात जवळील असणारे नागरिकांनी नदीत उद्या टाकून त्या दोन मुलांना बाहेर काढले. या मुलाना बाहेर काढल्यावर त्यांना नेरळ येथील धन्वंतरी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र सात वर्षाचा साहिलच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर दुसरा याकुबला अधिक उपचारासाठी पुढे नेण्याचा सल्ला दिला. कर्जत येथील ग्रामील उपजिल्हा रुग्णालयात याकुबला दाखल केल्यानंतर त्याच्यावर त्वरित उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सानितले. या सर्व घटनेने नेरळ मोहाची वाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत