आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमातील मंडप हवेने उडाला

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त 

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या शाळेतील एका कार्यक्रमात मोठा अनर्थ टळला. कार्यक्रम सुरू असताना अचानक मंडप उडाल्याने एकच धावपळ उडाली. मात्र कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.

आदित्य ठाकरे दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज येथील एका शाळेत विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आदित्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दोन हजार विद्यार्थीनी आणि ५०० विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता. कार्यक्रम सुरू असताना अचानक हवेचा दाब वाढला आणि संपूर्ण मंडप उडाला. मात्र काही क्षणानंतर हा मंडप पुन्हा आहे तसाच जागेवर आला. यावेळी मंडपाबरोबर मंडपचे चारही लोखंडी खांब उलटले होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे एकच धावपळ उडाली. विद्यार्थ्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत वेळीच परिस्थिती हाताळली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने वातावरण निवळले. त्यानंतर आदित्य यांनीही मीच जादूने हा मंडप वर नेऊन खाली आणल्याचं सांगितलं. त्यामुळे एकच खसखस पिकल्याने वातावरण हलकंफुलकं झालं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत