आदित्य ठाकरेंच्या फोटो वरून नवी चर्चा सुरु

महाराष्ट्र News 24 वृत्त

मंत्र्यांच्या दालनातील भिंतीवर नेत्यांची छयाचित्रे काही नवी नाहीत. राष्ट्रपती, पंतप्रधान यांचा प्रोटोकॉल असताना अन्य नेत्यांची छायाचित्रे त्यांच्या बरोबरीने लावलेली असतात. राज्यात नवी आघाडी सत्तेवर आली असताना आता शिवसेनेच्या मंत्र्यांच्या दालनात आमदार आदित्य ठाकरे यांचेही छायाचित्र दिसू लागले आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच ते उद्धव ठाकरे यांच्या समवेत अनेक बैठकांना आणि कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. आता आदित्य ठाकरे यांचे स्थान आणखीच उंचावल्याचे दिसत आहे. जसर्व आमदारांच्या एकत्रित फोटोत आदित्य मागील रांगेत उभे राहिले याची जशी चर्चा होते तसे अनेक वरिष्ठ आमदारांना डावलून त्यांचे सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या मागे बसणे याची देखिल चर्चा होते. आता शिवसेना मंत्र्याच्या दालनातील त्यांच्या फोटो वरून चर्चेला तोंड फुटले आहे. उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या दालनात आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे देसाई यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही आहे. तर भिंतीवर दुसऱ्या बाजुला आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. त्यामुळे शिवसेना मंत्र्यांसाठी आमदार आदित्य ठाकरे देखील बाळासाहेबांप्रमाणेच पूज्य आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत