आदित्य ठाकरेंना बसला खड्ड्यांचा फटका, आलिशान गाडीचा टायर फुटला

नाशिक : रायगड माझा वृत्त 

पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांचा मोठा मनस्ताप हा सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. मात्र आता या खड्ड्यांचा फटका हा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना देखील बसला आहे.नाशिकला दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात असताना घोटीजवळ मोठ्या खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटला. आदित्य ठाकरे सुखरुप असून टायर फुटल्याने त्यांना दुसऱ्या गाडीने हॉटेलला पोहचावे लागले.

Aditya Thackeray car tyre burst due to potholes near ghoti | आदित्य ठाकरेंना खड्ड्यांचा फटका, आलिशान गाडीचा टायर फुटला

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घोटीजवळ पाडळी गावात रस्त्यात मोठे खड्डे असल्याने ही घटना घडली. आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटल्याने त्यांच्यासोबत असलेल्या इतर मंडळींची धावपळ झाली. या घटनेनंतर आदित्य ठाकरे दुसऱ्या गाडीने गेले. तसेच त्यांची टायर फुटलेली गाडी टायर बदलण्यासाठी नाशिकला आणली गेली. याआधीही रस्त्यावरील खड्ड्यांबाबत प्रशासनाकडे तक्रार केली असली तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत