आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले; तर भाजपला धडकी

नाशिक: रायगड माझा वृत्त 

गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले. त्यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्याचा फटका शिवसेनेला बसला. त्यानंतर भाजपने शिवसेनेला बरोबर घेत सत्तेत स्थान दिले. पण, हे दुय्यम स्थान शिवसेनेला कधीच पचनी पडले नाही. त्यामुळे शिवसेनेने सत्तेत असूनही विरोधी पक्षाचीच भूमिका बजावली.

नांदगाव विधानसभेसाठी भाजप सरसावली असताना हा मतदारसंघ शिवसेनेकडेच असेल असे सांगत त्यावरही आपला हक्क या दौऱ्यानिमित्त पुन्हा सांगण्यात आला आहे.  नाशिकचा पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असे सांगत शिवसेनेने त्यावर दावा केला. या जागेवर भाजपच्या आमदार सीमा हिरे या निवडून गेल्या आहेत. या मागणीवरुन भाजपला धडकी भरली आहे. हा दौरा मतदारांचे आभार व जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी असला तरी त्यात अनेक मतदारसंघांवर दावे करण्यात आल्यामुळे भाजपसह राष्ट्रवादी व काँग्रेसच्या गोटातही चिंता वाढली आहे.

शिवसेनेमध्ये बऱ्याच कालवधीनंतर थेट संवाद साधला जात आहे. शिवसेनेत असताना राज ठाकरे निवडणुकीच्या अगोदर असे वातावरण निर्मितीचे काम करीत असत. पण, आता ही जबाबदारी आदित्य यांनी घेतली असून, त्यामुळे शिवसैनिक ‘चार्ज’ झाले आहेत.  आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. थेट संवाद साधल्यामुळे मतदारांबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. हा दौऱ्याला जोरदार प्रतिसाद मिळत असून, तो यशस्वी ठरला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत