रसायनी : रायगड माझा
घेरामणिक गडाच्या डोंगर रांगातील सारसईतील आदिवासी वाडयांतील आदिवासी बांधावाना आपटा गावात जाताना पाताळगंगा नदी वरील रेल्वेच्या जुन्या पुला वरून जिव धोक्यात घालुन जावा लागत आहे. सुरक्षितेचा उपाय म्हणुन रेल्वेने पदपथ बांधावा आशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.
आपटा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बागेचीवाडी, धनगरवाडी, टपोरावाडी, गोंविदवाडी, खडकीचीवाडी, सोनारवाडी, माडभवनवाडी, टोकाचीवाडी, आदि सारसईतील आदिवासी वाडीतील आदिवासी बांधव पाताळगंगा नदी ओलांडताना रेल्वे पुला वरून आपटा येथे बाजारहाट, सरकारी दवाखाना आणि इतर कामासाठी तसेच पनवेल किंवा पेण कडे जाताना एस टी बससाठी यावे लागते. रेल्वे पुला वरून जाताना आता पर्यंत झालेल्या अपघातात काहींना जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे या ठिकानी रेल्वे पुला वरून जाताना असुरक्षित आहे. रेल्वेच्या या पुलाच्या कडेला नागरिकांना जाण्यासाठी स्वतंत्र पदपथ बांधावा आशी मागणी आहे.
” सध्या कोकण रेल्वेच्या या मार्गाचे आपटा ते पेण दुपदरीकरण झाले आहे. दोन्ही मार्गा वरून रेल्वे गाड्या धावत आहे. रेल्वेच्या फे-या तशा कमी आहेत. त्यामुळे जुना मार्ग बंद ठेऊन पुलाला पदपथ बांधणे शक्य आहे. भविष्यात पनवेल रोहा लोकल गाड्या सुरू झाल्या तर पदपथाचे काम करणे अवघड होईल. नदीवरील नवीन पुलाला पदपथ बांधला आहे. तशा प्रकारचा पदपथ जुन्या पुलाला बांधाण्यात यावा. धर्मराज जाधव, सामाजिक कार्यकर्ता यांनी सांगितले “