आधारवाडी डंपिंग ग्राऊंड कायमचे बंद होणार

कल्याण : रायगड माझा ऑनलाईन 

वारंवार लागत असलेल्या आगीमुळे आधारवाडी डंपिंग ग्राऊंड कायमचे बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता बारावे गावातील शास्त्रीय पद्धतीने राबवण्यात येणाऱ्या घनकचरा विघटन प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

आधारवाडी डंपिंगला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे कल्याणकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. न्यायालयाने याआधीच आधारवाडी डंपिंगवर कचरा टाकणे बंद करण्याचे आदेश देऊन शास्त्रीय पद्धतीने हे डंपिंग बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र बारावे येथील घनकचरा विघटन प्रकल्पास ग्रामस्थांनी विरोध केल्याने आधारवाडीतच कचरा टाकला जात होता. आता मात्र बारावे प्रकल्प सुरू झाल्याने आधारवाडीत कचरा टाकणे बंद केले जाणार आहे.

बारावे प्रकल्प शास्त्रीय पद्धतीने राबवण्यात येणार असल्याने नागरिकांना याचा काही त्रास होणार नाही, असा प्रशासनाचा दावा आहे. ओला आणि सुका कचरा पूर्णपणे वेगळा करून जैविक पद्धतीने कचऱ्याचे विघटन केले जाणार आहे. शिवाय कचऱ्यावर आधारित वीज, सीएनजी प्रकल्पही राबवण्यात येणार आहेत. जवळपास 10 एकर क्षेत्रात 250 मे. टन क्षमतेचा हा घनकचरा विघटन प्रकल्प आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत