आधार डी-लिंक केल्यास पुन्हा ‘केवायसी’

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

आधार संलग्न ‘केवायसी’ बंद करण्यासाठी युआयडीएआयनं मोबाइल कंपन्यांना पर्यायी तजवीज करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं मोबाइल सिम कार्डशी लिंक केलेला आधारचा तपशील डी-लिंक करायचा असल्यास ग्राहकांना पुन्हा केवायसी भरावा लागणार आहे. त्यासाठी निवासी पत्ता किंवा ओळखीचा पुरावा मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीकडं जमा करावा लागेल.

आधारचा तपशील सिम कार्डशी जोडणं बंधनकारक नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला आहे. त्यामुळं अनेक नागरिक हा तपशील डी-लिंक करण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन युआयडीएआयनं एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन, आयडियासह इतर दूरसंचार कंपन्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. मोबाइल सिमकार्डची सत्यता पडताळण्यासाठी करण्यात येणारा आधारचा वापर कसा बंद केला जाईल. यावर १५ दिवसांत आपलं म्हणणं मांडा, असं युआयडीएआयनं सांगितलं आहे. कंपन्यांनी त्या दृष्टीनं तयारी केली आहे.

आधारचा तपशील डी-लिंक करायचा असल्यास कार्ड धारकांकडून अन्य पुरावे घ्यावे लागणार आहेत. यात ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, रेशन कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, बँक खाते पुस्तिका, वीज बील यांचा समावेश असेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत