“आधार –  द हेल्पींग हँडस्” अलिबाग राबविणार आगळावेगळा उपक्रम

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आधार –  द हेल्पींग हँडस्” या ग्रुप तर्फे दि. ०१/१०/२०१८ रोजी पासून “अन्नदान श्रेष्ठ दान” या नावे एक नवीन व वेगळा उपक्रम राबविण्याचे नियोजन.

बोर्ली मांडला:-अमूलकुमार जैन
अन्नदान श्रेष्ठ दान” या नावे एक नवीन व वेगळा उपक्रमात अलिबाग शहर किंवा आजूबाजूला असणाऱ्या ५ कि.मी.परीसरातील अनेक   प्रकारचे समारंभ होत असतात.होणाऱ्या समारंभात अनेक वेळा शिल्लक राहिलेले अन्न धान्य हे उघडयावर फेकून दिले जाते.मात्र ह्या फेकलेल्या अन्नधान्यातुन काही उपाशी किंवा गोरगरीब ज्यांना दोन वेळचे जेवण मिळत नाहीत असा व्यक्तींना त्या जेवणातून पोटाला आधार मिळेल.या उद्देशाने या आधार –  द हेल्पींग हँडस्”या संस्थेने ज्यांच्या घरी समारंभ असेल आणि त्या घरी कमीतकमी पंधरा ते वीस लोकांचे जेवण शिल्लक आहे .आणि ते फेकून द्यायचा विचार करीत असतील तर त्यांनी 9422383004, 9767514949, 8805569008, 9890313630 ह्या भ्रमणध्वनी वर संपर्क केला तर ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन ते शिल्लक राहिले ले अन्न घेऊन येतील आणि ते  अन्न गरजू लोकांपर्यंत निशुल्क , त्यामुळे पोहचविण्याचे काम ही संस्था करणार आहे.गरजू व्यक्तीपर्यंत ते अन्न पोहचले तर त्यांना समाधान प्राप्त होईल. आणि ज्या यजमानांनी हे अन्न दिले आहे त्यानापण आपले अन्न फेकून न देता ते गरजूंना उपयोगी आले याचे समाधान मिळेल.असे
आधार फाउंडेशनचे धनंजय म्हात्रे यांनी सांगितले.
तसेच त्यांनी सांगितले की,केरळच्या संपूर्ण इतिहासात झाला नसेल इतका पाऊस केरळमध्ये काही दिवसांपासून झाला आहे. या महापूरामुळे २.२३ लाख जनता आणि ५०,००० कुटुंबे बेघर झाली आहेत.
त्यांच्यासाठी मदतीचा भाग म्हणून आपल्या “आधार – द हेल्पींग हँडस्” अलिबाग या ग्रुपच्या माध्यमातून व लोक सहभागातून अत्यावश्यक गोष्टी जमा करण्यात येउन सर्व मदत ” राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, (RSS) शाखा – माटुंगा” यांच्या मार्फत केरळच्या पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
 या ग्रुपच्या वतीने काही दिवसांपूर्वी अलिबाग मध्ये काही मनोरूग्ण फिरत होते. त्यापैकी १ महिला आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवली होती. आणि १ पुरुष चोंढी नाका येथे सापडला या दोघांनाही पुढील योग्य उपचारासाठी आपण “श्रद्धा फाऊंडेशन”, वेणगाव – कर्जत यांच्या मदतीने त्यांच्याकडे  पाठविण्यात आले आहे
यापूर्वी देखील आपण ११ जानेवारी ला ४ मनोरूग्ण पाठविले होते. ते व्यवस्थित बरे होऊन त्यांच्या घरी पोहचले आहेत.त्याचप्रमाणे समुद्र किनारा स्वच्छता मोहीम, गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,मुखबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मदत असा प्रकारची अनेक समाजपयोगी कामे हाती घेण्यात आली आहेत, असे म्हात्रे यांनी सांगितले.
यासाठी  विनीत म्हात्रे. तसेच “श्रद्धा फाऊंडेशन”, वेणगाव – कर्जत यांची सर्व टीम. , धिरज जैन, . भरतशेठ जैन,  संतोष सागवेकर, जँकी सर, राजेश जैन,  सौ. श्वेता नारे व रसिका निचोरे आदीसाहित अनेकांचे सहकार्य लाभले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत