आनंददायक ! महाराष्ट्रात COVID-19 लशीची मानवी चाचणी नागपूरमध्ये होणार

Good News: महाराष्ट्रात नागपूरमध्ये होणार COVID-19 लशीची मानवी चाचणी

मुंबई: महाराष्ट्र News 24

राज्यात आणि देशात कोरोनाचा उद्रेक होत असतानाच देशात कोरोना लशीच्या मानवी प्रयोगांना सुरुवात होणार आहे ही दिलासा देणारी बाब आहे. पुण्यातल्या भारत बायोटेक आणि राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेच्यावतीने COVID-19वर लस  तयार करण्यात आली आहे. त्या लशीच्या मानवी चाचणीला देशात सुरुवात झाली आहे. तर महाराष्ट्रात पहिली चाचणी ऑगस्टमध्ये नागपूरला होणार आहे. देशात ज्या 12 सेंटर्सची निवड करण्यात आली त्यात नागपूरच्या एका हॉस्पिटलचाही समावेश आहे.

नागपूर इथल्या डॉ. चंद्रशेख गिल्लूरकर यांच्या गिल्लूरकर हॉस्पिटलची यासाठी निवड करण्यात आली आहे. तिथे ऑगस्ट महिन्यात या चाचण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यात दिल्ली, रोहतांग, हैदराबाद, पाटणा या 4 ठिकाणी पहिली चाचणी होईल. त्याचे परिणाम पाहून पुढच्या टप्प्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर कानपूर, गोवा, बेळगाव,  चेन्नई, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर इथल्य सेंटर्सवरही या चाचण्या केल्या जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यात 375 जणांवर तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये 750 जणांवर ही चाचणी होणार आहे. नागपूरमध्ये यासाठी 60 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सर्व करार झाल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे. हे सर्व निरोगी स्वयंसेवक असून त्यांच्यावर या लशीचे काय परिणाम होतात याचा अभ्यास केला जाणार आहे.

कोव्हॅक्सिन असं त्या लशीचं नाव आहे. या चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आले तर ती भारतासाठी दिलासा देणारी बाब असणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत