आनंदाने सण साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन

नवरात्रोत्सवानिमित्त दिघी सागरी  पोलिसठाण्यात नवरात्रउत्सव मंडळांची बैठक संपन्न

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

 नवरात्रोत्सव अवघ्या एका दिवसावर ठेपला असताना, त्या काळात राखण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिघी सागरी पोलिसांनी सोमवारी, ता 8 रोजी सकाळी नवरात्र उत्सवाच्या मंडळांसह एक बैठक घेतली.  पोलिस स्टेशनात ही बैठक पार पडली.सर्व नियम आणि अटींचे पालन करून उत्सव शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी यावेळी केले.

दिघी सागरी  पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक धर्मराज  सोनके यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. वीसहून अधिक नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. मंडळानी शांतता, कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन करुन उत्सव साजरा करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यावेळी उपनिरीक्षक पराग लोंढे,संदीप चव्हाण,निलेश सोनावणे,राहुल गायकवाड,बोर्लीपंचतन तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत तोडणकर,संतोष पाटील,सुरेश धोपट,जगणाथ चाळके, यांच्यासह स्थानिक नवरात्री मंडळांचे सभासद उपस्थित होते. गणेशोत्सव संपला की वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे. त्यामुळे हा उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळे नवरात्र साजरा करणाऱ्या विविध लोकांनी याची जय्यत तयारी करण्यास सुरुवात केली आहे. या उत्सवासाठी सार्वजनिक मंडळांच्या मंडप उभारणी आणि दांडीया महोत्सवाच्या तयारीचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.

बाजारपेठा सजल्या :

नवरात्रीचे घट बसविण्यासाठीही बाजारात पूजेचे साहित्य, फुले, देवीच्या मूर्ती यांच्या खरेदीला वेग आला आहे. तसेच तरुणाईचे आकर्षण असलेल्या दांडीया-गरबासाठी पारंपरिक वेशभूषा, विविध प्रकारच्या दांडिया यांच्या खरेदीसाठी लगबग उडाली आहे.

 

डीजे वर बंदीच –

न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे वर राज्यात सर्वच ठिकाणी डीजे वर बंदी आहे. नवरात्रोत्सवात मंडळांनी डीजे वाजवल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे यावेळी पोलीस अधिकारी सोनके यांनी स्पष्ट केले. यावेळी स्थानिक नवरात्रोत्सव मंडळांनी डीजे वाजवणार नसल्याची ग्वाही पोलिसांना दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत