आनंद कांबळे हत्या प्रकरणाला वेगळे वळण .. पत्नीनेच रचला कट ….

महाबळेश्वर : रायगड माझा 

आनंद कांबळे हत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सुरवातीला ही घटना  लुटमारीतून घडली असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला गेला. यात नवविवाहिता दिक्षाच्या गळ्यातील मंगळसूत्रही हल्लेखोरांनी लंपास केलं. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला. मात्र गुन्हे अन्वेशण विभागाच्या पथकाने शिताफिने तपास करुन पत्नी दिक्षाला बोलतं केलं आणि ही खळबळजनक घटना उजेडात आली.

 

 

 

असा समोर आला कट
दिक्षाचे पुणे येथील नितीन मळेकर या युवकासोबत प्रेमसंबध होते. लग्नाला घरातील लोकांकडून विरोध असल्यामुळे तिने घरातील लोकांच्या मर्जीने नातेसंबधातील आनंद कांबळे याच्यासोबत 26 मे रोजी विवाह केला. हे नवदाम्पत्य महाबळेश्वरला हनीमूनसाठी निघालं होतं.

महाबळेश्वरला जाताना दिक्षाने पसरनी घाटात उलटी होत असल्याचं नाटक करुन पतीला गाडी थांबवण्यास सांगितलं. त्याच वेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोन युवकांनी कोयत्याने आनंदवर सुमारे दहा ते बारा वार केले आणि जाताना दिक्षाच्या गळ्यातील मंगळसूत्रही हिसकावून नेलं.

जखमी झालेल्या आनंदला साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी नेण्यात आलं. मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं. पोलीस तपासात दिक्षा आणि तिचा पूर्वीचा प्रियकर नितीन मळेकर या दोघांना अटक करण्यात आली. ज्यांनी हा हल्ला केला ते दोन आरोपी मात्र अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत