आमच्या हृदयात ‘संभाजीनगर’.. शिवसेनेचा राज ठाकरेंवर टोला

'संभाजीनगर' आमच्या हृदयात.. 'त्या' बॅनरबाजीवरून शिवसेनेनं राज ठाकरेंना डिवचलं

महाराष्ट्र News 24

‘प्रजासत्ताक दिनापर्यंत औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करा नाहीतर…, असे बॅनर मनसेकडून ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. औरंगाबाद शहराच्या नामकरणावरून आता मनसे आक्रमक झाली आहे. यावरून आता शिवसेनेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचलं आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, औरंगाबाद शहरातील मनसेची बॅनरबाजी ही निवडणुकीच्या तोंडावर सुरु आहे. मनसेच्या होर्डिंगवर ‘नाहीतर’ असं लिहिलेले आहे. असे अनेक ‘नाहीतर’ आम्ही पाहिले आहेत. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.

अनिल परब यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मनसेच्या औरंगाबाद शहरातील बॅनरबाजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मनसेची बॅनरबाजी ही केवळ निवडणुकीच्या तोंडावर आहे. ‘संभाजीनगर’ हे नाव आमच्या हृदयात आहे. आम्ही नेहमीच संभाजीनगर म्हणतो, असंही अनिल परब यांनी सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत