आमटे दाम्पत्य KBCमध्ये अमिताभ यांच्या सोबत!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

‘कौन बनेगा करोड़पती’चा नवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या ‘केबीसी’मध्ये समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे येणार आहेत. खुद्द ‘केबीसी’चे होस्ट अमिताभ बच्चन यांनी ही माहिती दिली आहे. येत्या ७ सप्टेंबरला या भागाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

छोट्या पडद्यावर सर्वात लोकप्रिय ठरलेल्या ‘केबीसी’ची यंदाची सुरुवात आतापर्यंतच्या सर्व भागापेक्षा वेगळी होणार आहे. ‘कर्मवीर’ या विशेष भागाने सुरु होणाऱ्या कार्यक्रमात आमटे दाम्पत्य येणार आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटवरून ही माहिती दिली.

‘या दोन मोठ्या व्यक्तींच्या सोबत काही काळ राहण्याचे भाग्य मला मिळाले. डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे जीवन आणि ते करत असलेले काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ‘केबीसी’च्या कर्मवीर या विशेष भागात ते माझ्या सोबत होते,’असे अमिताभ यांनी म्हटले आहे.

सर्वसामान्य नागरिकांबरोबरच स्टार, खेळाडू आणि अन्य क्षेत्रातील दिग्गज लोकांना ‘केबीसी’मध्ये याआधी अनेकदा बोलवण्यात आले होते. पण सामाजिक क्षेत्रातील इतके मोठे योगदान देणाऱ्या आमटे दाम्पत्यामुळे हा कार्यक्रम खास ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत