आमदार प्रताप सरनाईक अडचणीत; किरीट सोमय्या पुरावे घेऊन थेट ED कार्यालयात

महाराष्ट्र News 24

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 250 कोटी रुपये ढापले आहेत. त्यांनी कंपनीचे नावही बदलले आहे. सरनाईक यांनी ज्यांच्या संपत्ती जप्त केल्या त्यांची नावे सातबाऱ्यावर नसल्याचा दावा करतानाच सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या विहंग सोसायटी घोटाळ्याची तक्रार ईडीकडे केली आहे. सरनाईक यांच्या नावावर 112 साताबारे असल्याची माहिती सोमय्या यांनी ईडीला दिली आहे.

सरनाईक यांनी या सोसायटीतील काही संपत्ती हडप केल्याचा आरोप करतानाच सरनाईक यांच्याकडे 112 सातबारे असल्याची तक्रारही सोमय्या यांनी ईडीकडे केली आहे.

सोमय्या यांनी कांजूरमार्ग कारशेडवरूनही सरकारवर टीका केली आहे. एमएमआरडीने काय कारनामे केले हे कांजूरमार्ग कारशेडमध्ये सर्वांनी पाहिले आहेच, असं सांगतानाच एमएमआरडीए ठाकरे सरकारच्या सचिवासारखे काम करत असल्याची टीकाही सोमय्या यांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत