आमदार बच्चू कडू यांचे पुण्यात शोले स्टाईल आंदोलन

पुणे : रायगड माझा वृत्त

थकीत एफआरपीच्या मागणीसाठी आज प्रहार संघटनेतर्फे साखर संकुलाच्या इमारतीवर चढून आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्तांना घेरावही घालण्यात आला.साखर कारखानदारकडून एफआरपी मोठ्या प्रमाणावर थकवली गेली आहे. अशा कारखानदारावर कारवाई करावी. या मागणीसाठी साखर आयुक्तांना आमदार बच्चू कडू आणि शेतकर्‍यांनी घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली. सन 2018-19 गळित हंगाममधील राज्यातील कारखानदारंकडून 1500 कोटी आणि सोलापूर आणि सातारा जिल्हयातील शेतकऱ्यांचे 600 कोटी रूपये एफआरपीची रक्कम कारखानदारांकडून येणे आहे. वास्तविक ऊस गेल्यानंतर 14 दिवसात एफआरपीची रक्कम मिळणे बंधनकारक असताना आणि गळीत हंगाम संपून चार महिने उलटल्यानंतर सुध्दा एफआरपीच्या रक्कमे पैकी 1500 कोटी रूपये अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ती रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी यासाठी आज आमदार बच्चू कडू यांच्या प्रहर संघटनेतर्फे पुण्यातील साखर संकुलात आंदोलन केले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी कारखानदारांकडून शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसात मिळावी अशी मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत