आमदार रमेश लटके यांच्या खासगी सहाय्यकाचा मृत्यू

नागपूर : रायगड माझा 

आमदार रमेश लटके यांच्या खासगी सहाय्यकाचा मृत्यू झाल्याची घटना आज नागपुरातील आमदार निवासात घडली. विनोद अग्रवाल (वय 50 वर्षे) असे त्यांचे नाव आहे. मुंबईतील अंधेरी पूर्वचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या नावावर असलेल्या रुममध्ये ते मृतावस्थेत सापडले.

दुसऱ्या क्रमांकाच्या विंगमधील 46 क्रमांकाच्या रुममध्ये विनोद अग्रवाल यांचा मृतदेह आढळला. सकाळी बराच वेळ दार वाजवूनही विनोद अग्रवाल यांनी रुमचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर लॉक तोडून आत प्रवेश केल्यानंतर ही घटना लक्षात आली.

विनोद अग्रवाल यांचा मृत्यू कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत. झोपेतच हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यंदा पहिल्यांदाच नागपुरात पावसाळी अधिवेशन होत आहे. सर्व आमदार उद्यापासून सुरु होणाऱ्या या अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. हे अधिवेशन 4 जुलै ते 20 जुलै या काळात चालणार आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत