आमिरच्या ‘महाभारत’ आधी दिग्दर्शक कुणाल कोहली आणणार ‘रामायण’

मुंबई :रायगड माझा वृत्त 

‘महाभारत’ आमिर खानचा आणि देशातील पहिलाच सर्वांत महागडा चित्रपट असणार आहे. पण, आमिरच्‍या या ड्रीम प्रोजेक्टआधी मोठ्‍या पडद्‍यावर ‘रामायण’ येणार आहे. दिग्दर्शक कुणाल कोहली चित्रपट ‘रामायण’ आणणार आहे.

‘हम-तुम’ आणि ‘फना’ यासारखे हिट चित्रपट कुणालने दिले आहेत. या नव्‍या प्रोजेक्ट बद्‍दल खूपच उत्साहित असून नव्‍या ढंगात ‘रामायण’ आणणार असल्‍याचं त्‍याने म्‍हटलयं.

कुणाला म्‍हणाला, ‘रामायणातल्‍या भूमिका आणि मॅसेजची आज जितकी गरज आहे, तितकी गरज याआधी भासली नाही. आपण अशा काळात जगत आहोत, जिथे आपल्‍याला रामायणातील मूल्‍ये, शिकवणची आवश्‍यकता आहे. रामायणातील शिकवणींची सर्वांत जास्‍त आवश्‍यकता आता आहे. ‘रामायणा’वर चित्रपट आणण्‍यामागे कुठलाही राजकीय उद्‍देश नाही.’

‘रामायण’मध्‍ये नव्‍या कलाकारांना संधी दिली जाणार आहे. पौराणिक कथेसाठी आपल्‍याला माहित असलेले चेहरे योग्‍य नाहीत, असे मला वाटते, असेही कुणाल म्‍हणाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.