आम्हाला राज्यातल्या सत्तेत सहभागी करुन घ्या-रामदास आठवले

नवी दिल्ली : रायगड माझा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला राज्याच्या सत्तेत सहभागी करुन घ्या, अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते नागपूर येथे बोलत होते.

आम्ही कधीच भाजप विरोधात काही विधानं केलं नाही. मात्र एक मंत्रीपद आणि विधान परिषदेत एक आमदार असावा या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, आठवलेच्या मागण्या मान्य होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.