आम्ही केलेले उपोषण श्रेयासाठी नसून विकासासाठी- विजय हजारे

नेरळ : अजय गायकवाड

नेरळ प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांबाबत आणि नेरळ प्राथमिक आरोग्य सेवेच्या प्रश्नासह अन्य मागण्यासाठी नेरळमध्ये सुरु झालेले उपोषण रात्री उशीरा सोडण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करणार असे आश्वासन दिल्यानंतर जय मल्हार रिक्षा चालक मालक मंडळाने आपले उपोषण सोडले.

उपोषणकर्त्यांनी केलेल्या मागण्या शासन स्तरावर मंजूर झाल्या असून त्यासाठी लागणारा निधी तत्काळ संबधित विभागाकडे दिला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री उपोषणकर्त्यांना फोनद्वारे दिले. मात्र या सर्व मागण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण न झाल्यास आम्ही पुन्हा याच ठिकाणी उपोषणाला बसू असा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी शासनाला दिला आहे. दरम्यान उपोषणकर्ते विजय हजारे यांनी शेकापचे प्रवीण पाटील यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिउत्तर दिले. रत्याच्या दुरुस्तीसाठी कोणताही निधी मंजूर झाला नसून त्या संदर्भातली माहिती देखील जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळाला भेट दिल्यानंतर दिली आहे. त्यामुळे आम्ही कोणतेही श्रेय घेत नसून रस्त्याचे काम झाले पाहिजे हाच आमचा मूळ उद्देश असल्याचे विजय हजारे यांनी स्पष्ठ केले. यावेळी उपोषणकर्त्यांची कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्यासह रायगड जिल्हापरिषदेचे अधिकारी यांनी भेट घेतली. यावेळी उपोषण कर्त्याच्या मागण्या मान्य करून त्या वेळत पूर्ण करण्याचे अश्वासन दिल्यांनतर त्यांनी आपले उपोषण सोडले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत