आयपीएलच्या अकराव्या मोसमाला मुहूर्त सापडला

रायगड माझा

आयपीएलच्या अकराव्या मोसमाची सुरुवात यावर्षी 7 एप्रिलपासून मुंबईत होणार असून अंतिम सामनाही मुंबईतच 27 मे रोजी खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या प्रशासकीय समितीने वेळापत्रकासोबतच यावर्षी सामन्याच्या वेळेतही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दुपारी चार वाजता आणि रात्री आठ वाजता सामना सुरु व्हायचे, त्यात आता बदल करण्यात आला आहे. प्रसारकांनी सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा आग्रह धरला होता आणि आयपीएलच्या प्रशासकीय समितीने तो आग्रह मान्य केला आहे, अशी माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली. आठ वाजता सुरु होणाऱ्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण आता सात वाजता सुरु होईल आणि दुपारी चार वाजता सुरु होणाऱ्या सामन्याचे प्रक्षेपण सायंकाळी साडेपाच वाजता होईल, असे राजीव शुक्ला यांनी सांगितले. किंग्ज इलेव्हन पंजाब आपले चार सामने मोहालीत, तर तीन सामने इंदूरमध्ये खेळणार आहे. दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या होमग्राऊंडबाबतचा निर्णय राजस्थान हायकोर्टाच्या 24 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर घेतला जाईल. यंदाच्या आयपीएलसाठी 27 आणि 28 जानेवारी रोजी लिलाव होणार आहे, ज्यात 360 भारतीयांसह 578 खेळाडूंवर बोली लावली जाईल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत