सातारा : रायगड माझा
चेन्नई सुपर किंग व सनरायझर हायद्राबाद यांच्यात सुरु असलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणार्या तिघांना सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सातारा शहरातील पोवई नाक्यावरील मेहता सेल्युलर शेजारी आयपीएलच्या अंतिम सामन्यावर तिघे सट्टा लावत असल्याची माहीती पो.नि. नारायण सारंगकर यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सुचना देत पोवई नाक्यावर सट्टा लावणार्या तिघांना ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेले तिन्ही संशयित परप्रांतीय असुन त्यांची कसुन चाैकशी सुरु आहे.
शेयर करा