आयपीएल बेटिंग प्रकरणात साजिद खानचाही सहभाग?

ठाणे : रायगड माझा

ठाणे खंडणीविरोधी पथकाने उघडकीस आणलेल्या आयपीएल बेटिंग प्रकरणात अभिनेता अरबाज खाननंतर आणखी दिग्दर्शक, अभिनेता साजिद खानही बेटिंग अडकण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बेटिंगचे बॉलिवूड कनेक्‍शन पुन्हा एकदा समोर आले आहे.

सात वर्षांपूर्वी साजिद खानने आपल्या माध्यमातून क्रिकेटवर बेटिंग केल्याची माहिती अटकेत असलेला बुकी सोनू जालान याने दिली आहे. त्यामुळे साजिद खान याची चौकशी करण्यात येऊ शकते. आयपीएल बेटिंग प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून अटकेत असलेला बुकी सोनू जालान याची कसून चौकशी सुरु आहे.

सोनू जालानने साजिदची माहिती पोलिसांना दिल्यामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणात साजिद खानला लवकरच चौकशीला बोलावले जाण्याची शक्‍यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत