‘आयसीसी’ची कसोटी क्रमवारी जाहीर, कोहलीचे ‘नंबर वन’ स्थान अबाधित

दुबई : रायगड  माझा वृत्त 

‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱया चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी फलंदाजी क्रमवारीत ‘नंबर वन’ स्थानी अबाधित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली.

विराट कोहलीने 935 गुणांसह अव्वल स्थान राखले. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो आपले रेटिंग गुण आणखी वाढविण्याचा प्रयत्न करेल. फलंदाजी क्रमवारीत दुसऱया स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथच्या खात्यात 910 गुण आहेत. त्याच्यावर सध्या बंदी असल्याने कोहलीच्या ‘नंबर वन’ सिंहासनाला कुठलाही धोका नाही. उलट स्मिथचे गुण 900 पर्यंत खाली येणार आहेत.

गोलंदाजी क्रमवारीत रबाडा पुन्हा अव्वल
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने ‘आयसीसी’च्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान काबीज केले. त्याने इंग्लंडच्या जेम्स ऍण्डरसनची जागा घेतली. ऍण्डरसन श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत खेळला नव्हता. त्यामुळे त्याला 9 रेटिंग गुणांचा फटका बसला असून तो रबाडापेक्षा 8 गुणांनी मागे पडला. पाकिस्तानचा यासिर शाहने न्यूझीलंडविरुद्ध 14 बळी टिपल्याने त्याने 9 क्रमांकाने झेप घेत दहाव्या स्थानी पोहोचला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत